कालचा दिवस आमचा सगळ्यांचा सारखाच सुरु झाला असणार, आवरसावर करून आम्ही ऑफिसला पोचलो computer समोर बसलो fb चेक केलं whats app चे मेसेज बघितले आणि एक धक्कादायक बातमी समजली, आमच्यातली एक… बातमी देणारी…तीच एक बातमी झाली होती…ती गेली होती…एका भयानक अपघातात तिचा जीव गेला.…
निदान माझा तरी ह्यावर बराच वेळ विश्वास बसला नाही, नाशिक बाहेर असल्याने सगळी शोधा - शोध करून बातमी confirm केली, तोवर fb वर पोस्ट आदळत होत्या…. ती खरच आम्हाला सोडून गेली होती …
प्रियंका तुझ्या सोबत शाळेत, तुझ्या वर्गात शिकलेल्या सगळ्यांची हीच अवस्था होती काल, computer screen समोर बसलो होतो आम्ही पण डोक्यात तुझेच विचार पिंगा घालत होते…. राहून राहून डोळ्याच्या कडा पाणावत होते, आत्तासुद्धा तेच होतंय.…तूच बातमी होशील असं आमच्या मनातही नाही आलं ग.….
रोज पेपर मध्ये अपघाताच्या बातम्या वाचतो, मरण पावलेले जीव कोणाचे कोणीतरी असतात, बातमी देणारे निर्विकार पणे ती बातमी छापतात आणि आम्ही वाचणारे सुस्कारे सोडून पेपर गुंडाळून ठेवतो, कालचा पेपर महत्वाचा वाटला मला…
off period मध्ये कवितांसाठी फ़ेमस, आम्हाला तुझ्या कविता समजल्या नाहीत फारश्या कधी, पण शाळेत कोण काय होणार ह्यावर मी लेखिका होणार हे तुझं ठाम उत्तर, सगळ्या शिक्षकांना सुद्धा तुझ्या बद्दल वाटणारा अभिमान, मराठीवर तुझं प्रेम, तुझी हसरी छोटी मूर्ती…… हे सगळं डोळ्यासमोर तरळतय आज.
आपण सगळ्यांनी सोबतच सुरवात केली, पण career च्या बाबतीत तू आमच्या फारच पुढे निघून गेलीस, आम्ही बापुडे तुझे नसिरुद्दीन शाह आणि अनुष्का शर्मा सोबतचे फोटो पाहूनच थक्क होत असू, "अब इसकी तो निकाल पडी !!" असा विचार आमच्या सगळ्यांच्या मनात आला. इतक्या कमी वयात विशाखा पुरस्काराला तू गवसणी घातलीस, अजूनही बरेच पुरस्कार तू मिळवलेस, इतक्या छोट्या आयुष्यात इतकी मजल मारलीस!! पेपर च्या छोट्या बातमी पासून स्वतःच्या column परेंत पोचलीस , Bravo!!
तसं पाहिलं तर माझा तुझा शाळेनंतर फारसा काही संपर्क नवता, नाहीच म्हणा. फक्त HPT मध्ये सोबत होतो, ते सुद्धा arts आणि science वाल्यांच्या वाकड्या मुळे आपला फारसा काही contact नवता. शाळेत जरी नाही तरी HPT मध्ये तुला तुझ्या frequency चे लोक भेटले बहुतेक. तिथे तू आयोजित केलेला G.A. न वरचा कारेक्रम आम्ही अनुभवला. फारच झटत होतीस तू जणू फार काही achieve करायचं होतं आणि वेळ कमी होता…….
पण तुझी प्रगती ख्याली खुशाली fb वर समजत होती…. तू फारच active होतीस तिथे, आवर्जून कोणाच्याही post वर like करणे, स्वतः कितीतरी गोष्टी टाकत राहणं , तुझं आयुष्य होतंच happening!!
ज्या लोकांना तू भेटलीस त्यांना आपल्यातली चमक दाखवलीस…Its evident from your fb page now...
माझ्या मागच्या blog post वर तू comment केली होतीस, ती महत्वाची ह्यासाठी होती कारण लिखाणातल्या धंद्यातल्या कोणीतरी वेळ काढून माझा blog वाचला आणि comment केली. आमच्यासारख्या हौशी लेखकांना हे प्रोत्साहन पुरे आहे.
तुझ्या वर लिहिणारे तुला ओळखणारे आज हजारो लोक आहेत, ते कदाचित माझ्या पेक्षा खूप काही लिहू शकतील पण शाळेतली वर्गमैत्रीण म्हणून मला तुझ्या बद्दल आदर होता आणि राहीलच…
२००४ ची विद्या प्रबोधिनी ची दहावीची batch तुला खूप miss करेल.…… आमची माई होतीस तू……