आज सहजच माझ्या सोबतच्या एका जेष्ठ शिक्षिकांशी बोलण्याचा प्रसंग आला. विषय होता तोच चावून चोथा झालेला "येणारा lot कित्ती वाईट " हा lot म्हणजे मुलं. चाळीस ते पन्नास वयाच्या दरम्यान असलेल्या सगळ्या महाविद्यालयीन शिक्षकांना विचारा तुम्हाला हीच रड ऐकू येईल. ह्यांचा आरोप असा कि आजकाल मुल पाठांतर करून मार्क मिळवतात, त्यांची कसली म्हणून लायकी नाही, नाही तर आमच्या वेळेस आम्ही कित्ती अभ्यास करायचो तेव्हा कुठे first class मिळायचा, थोडक्यात आमची लायकी फार जास्त होती!!आणि आत्ता 'ह्या असल्या' मुलांना शिकवणं म्हणजे आम्ही 'लाख' मोलाची प्रतिभा वाया घालवण्या सारखं आहे.
त्या बाईना मी बोलू दिलं , वेळी अनुमोदन पण दिलं ; म्हणजे मी बरेचदा असा करते, त्यांनी होतं काय कि माणूस आपल्या मनातलं सगळं बोलून जातो, त्याला असं वाटत राहत कि समोरचा आपल्याच विचारांचा आहे, अश्यात आपल्याला त्या माणसाची चांगली पारख करता येते. बरं असो, तो काही आपला मुद्दा नाही, तर, त्या बोलता बोलता फारच उणीदुणी काढू लागल्या, "ह्या मुलांना विषयाच्या application बद्दल विचारा काही म्हणून येणार नाही", " पुढे M.Sc. ला गेल्यावर साधे ५०% मिळवणं कठीण होतं ह्यांना". मुलांचा नंबर झाल्यावर त्या कॉलेज आणि विद्यापीठाच्या कारभारा वर घसरल्या, कसा आम्हा शिक्षकांना त्रास आहे, कसं कोणीच आम्हाला सध्या सुविधा सुद्धा पुरवत नाही आणि तरी आम्ही इतकी वर्ष गपगुमाने काम करतोय इत्यादी इत्यादी. काही मुद्दे त्यातले बरोबर असतीलही कदाचित पण बाकी सर्व अतिशयोक्तीच होती. कारण त्यांच्याच सोबत काम करणाऱ्या अजून एका प्रध्यापिकांना मी इतकी ओरड करतांना कधी बघितलं नवतं. आणि बहुतांशी लोक ह्याच category मध्ये असतात.
पण माझा ह्या सगळ्या senior प्राध्यापकांना प्रश्न आहे, मुलं वाईट आहेत हा त्यांचा दोष आहे का फक्त? आणि असतीलही तरी त्यांना सुधारण्याचा तुम्ही किती प्रयत्न केलाय? आज F.Y., S.Y. ला येणारी मुलं हि ज्या शिक्षण व्यवस्थेतून आली तीच, थोड्या फार फरकाने आमची म्हणजे माझ्या वयाच्या सगळ्यांची व्यवस्था होती. मला कधीही हे आठवत नाही कि माझ्या शाळेत किंवा महाविद्यालयीन शिक्षणात मला स्वतःला कधी विषयाची applications काय आहेत बरं? असा प्रश्न कोणत्या शिक्षकाने विचारला असेल, निदान ते शोधण्या साठी अमुक अमुक पुस्तक वाच म्हणून सांगितल असेल.
ढोबळ मानाने येणारे विद्यार्थी हे थोड्या फार फरकाने सगळे सारखे असतात, कधीही शिक्षकाला त्या मुलां पेक्षा जास्तच येत असतं, अपेक्षा तरी अशीच आहे. जरा मागे जाऊन शालेय शिक्षणाचा विचार करा, एखाद्या सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याची गोष्ट घ्या, तो रोज शाळेत जातो, शिकतो मग परीक्षा असते, त्यात पुस्तकात धड्या मागचे प्रश्न आणि अजून काही असे माहितीतले प्रश्न येणार असतात, घरच्यांनी परीक्षेतले मार्क हा प्रतिष्ठेचा विषय बनवला असतो, आणि नाही प्रतिष्ठेचा तरी अमुक अमुक मार्क मिळवण हि चांगला विद्यार्थी असण्याची निशाणी आहे असा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा होरा आहे. मग तो विद्यार्थी स्वतः किंवा classes च्या मदतीने "चांगले" मार्क मिळवण्याच्या स्पर्धेत सहभागी होतो. एकदा ते मिळाले कि ते टिकवणे ओघाने आलेच, नाही तर प्रश्नांची सरबत्ती आणि टोमण्यांचा मारा असतोच.
चला शाळेच्या विद्यार्थ्य कडून फार काही अपेक्षा नाही ठेवल्या तरी "इतकं लिही म्हणजे पुरे!!! " हि विचारसरणी सुद्धा ठीक आहे, पण आता शाळांची मुलांना पास करण्याची policy असते, आठवी परेंत पास करा म्हणे, माझी एक मैत्रीण एका शाळेत नोकरीला लागली होती तिथे मुलांनी लिहिलेल्या साफ चुकीच्या प्रश्नाला सुद्धा मार्क दे, वेळी स्वतः पेपर लिही!!! इथवर तिला तिच्या वरिष्ठांनी सांगितलं. ती सुद्धा बिचारी नोकरी चा प्रश्न आणि लहान म्हणून, मन मारून ते काम करत राहिली, मग सोडून निघून गेली. पण आमच्या सारख्या मुलांना ज्यांनी खरोखर कष्ट करून मार्क मिळवले आहेत असे मार्क देणं म्हणजे पाप केल्यागत वाटतं. थोडक्यात "आपण पास होणार" हा message मुलां परेंत पोचला आहे, आता जर पाच सात वर्षे जुन्या पाठ करून लिहिण्याच्या सवयीला सुद्धा आपली व्यवस्था फाटा देत असेल तर मग application oriented शिक्षणाची तर बातच सोडा.
पुढे व्यावसायिक शिक्षणा बद्दल मला माहित नाही पण नियमित science, Arts, commerce चे पेपर बघा, वर्षभर अभ्यास करू नका आणि शेवटी मागचे १० पेपर पाठ करा आणि भरगोस मार्क मिळवा असा फंडा आहे. काही महाभाग हे सुद्धा करत नाहीत!! पण काही अंशी हि मुलं थोडा वेगळा approach देण्याच्या वयात असतात. हा विषय मी का शिकतोय? ह्याच उपयोग कुठे होतो? असे प्रश्न त्यांना पडतात, आणि हि मुलं दिलेली उत्तर समजण्याच्या वयात असतात, मग ह्यांची उत्तर देण्याची जवाबदारी कुणाची?
शाळेच्या शिक्षकांबद्दल मला काहीच बोलायचं नाही कारण माझा स्वतःचा तिथे काम करण्याचा अजिबात अनुभव नाही त्यामुळे शिकवण्या खेरीज त्यांना अजून कार्यालयीन किती आणि कोणती कामं असतात हे मला मुळीच माहित नाही. वाचून फक्त माहित आहे कि महाविद्यालयीन शिक्षकांपेक्षा जास्तच असतात.
मग आता आपले लाडके महाविद्यालीन शिक्षक (इथे मी सगळ्यांबद्दल बोलत नाही ) ज्यांना येणाऱ्या वाईट lot चा भारीच त्रास होतो त्यांच्यावर बोलू. एकतर ह्यांची मानसिकताच मूळी दुषित असते, आपण करत असलेल्या कामाबद्दल आस्था आणि प्रेम हे बेडगी असतं. जात आणि धर्मावर मुलांमध्ये भेदभाव करणारे शिक्षक पाहून तर मला हादराच बसला. अश्या ह्या शिक्षकांनी, ज्यांनी मला सुद्धा शिकवलं आहे ;मला हे सांगाव कि एखाद्या topic वर काय नवीन माहिती मुलांना देता येईल, जेणे करून त्यांचा विषयातला interest develop होईल असा विचार तुम्ही करता का हो? मला विद्यार्थी म्हणून विचारलं तर मी नाहीच म्हणेन. मी B.Sc.केलं ह्यात मुलांचा interest develop करण्याचा , अभ्यास, वाचन करायला प्रवृत्त करायचा बराच scope होता. मला क्वचित असा प्रसंग आठवतो जिथे शिक्षक मुलांच्या बुद्धीला चालना देण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही हे reference books वाचा, हे journal वाचा, असे सांगणारे शिक्षक फारच विरळा. ह्या वर "मुलांना काय समजणार डोंबल " हा ह्यांचा शेरा. पण त्यांना समजणारी पुस्तक कोणती हे शिक्षक तेव्हाच सांगेल जेव्हा त्यांचं स्वतःच वाचन असेल. हे लोक कोणे एके काळी केलेल्या आपल्या M.Sc. वरच खुश, आणि तेच किती उत्कृष्ठ शिक्षण म्हणून नवीन काहीही न वाचणारे!!
महाविद्यालयात NAAC आणि ISO लावले खरे पण त्याचा मूळ हेतू अजिबातच सध्या झाला नाही. ह्यात शिक्षकांनी research करण्यावर भर देण्यात आला आहे, आणि हि गरज सुद्धा आहे. मुद्दा असा कि संशोधनाच्या निमित्ताने शिक्षकाचं काही वाचन होईल आणि पर्यायाने त्याचा मुलांना फायदा होईल. पण ह्या संशोधनाचा जो बाजार चालू झाला आहे त्या बद्दल न बोललेलंच बरं.
वर्गात सगळ्या बौद्धिक स्थराची मुलं येतात, त्या पैकी सगळ्यांना समजेल असं शिकवणे आणि हुशार, मेहेनती मुलांच्या बुद्धीला चालना देणारे प्रश्न विचारणे हि शिक्षकाची जवाबदारी आहे. शेवटी गरज निर्माण जोवर होत नाही मुलं सुद्धा काम करणार नाहीत "शेवटी ते तुमचेच विद्यार्थी नाही का?".
तुम्ही असे छोटे छोटे projects द्या ज्यांनी मुलांना विषयाची applications शोधण्याची गरज पडेल, नुसता topic शिकवतांना अमुक अमुक ठिकाणी हे वापरतात हे सांगा, त्यांना वाचायला उदुक्त करा. फक्त syllabus वाढवून आमच्या डोक्याला कसा देवा ताप होतो हि रड बंद करा.
ऐन शिक्षक दिनाच्या जवळ हे पोस्ट लिहितेय मी, पण हेतू काही तरी सुधार व्हावा हाच आहे. शेवटी
गुरु ब्रम्ह आणि विष्णू आहे असं श्लोक जरी म्हणत असला तरी देव चुकत नाही असं कोण म्हणतंय ?

Really true...it is same all over India
ReplyDeleteand that's the worst part isn't it?
Deletekhupach chan lihila ahes harshada
ReplyDeletethank you!!!
Deletekay sangu vachtana asa vatal ki mi pan nemak hech anubhavtiye.
ReplyDeleteani vel kadhun lihit raha g... chhan lihites. :-)
Asa vatal vachtana ki kharach mi pan hech anubhavtiye. We r not ready to change as a teacher and we expect these things from students. hw strange it is?
ReplyDeletemost awaited comment.....thank you priya :-) lihin nakki......kharach
Deleteits really bad to see that the situation is same allover