माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि लोकांबद्दलचं माझं मत.....

Monday 13 August 2012

Morning Glory

              फेब्रुवारी , मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै आणि आता ऑगस्ट; महिने मोजतेय मी. मागची  पोस्ट
 लिहून इतके दिवस झाले, नाही म्हणायला माझ्या काही लाडक्या (मोजक्या) वाचकांना आठवण झाली "लिहित का नाहीस गं हल्ली?" असे गोड प्रश्न त्यांनी विचारले, पण माझ्यातल्या लेखकाकडे
त्यांची  उत्तरं  न्हवती; कदाचित लेखकाला डोकावायला वेळच न्हवता.
               पण कधी - कधी काही गोष्टी अश्या घडतात कि ज्या वेळ काढायला भाग पडतात. तुमच्या आयुष्यात गोष्टी ठीक-ठाक चालू आहेत; अगदी हव्या तश्या नाहीत पण अगदीच नकोश्या पण नाही पण तरी......
              एका point ला तर मला असं  वाटायला लागल होत कि माझा  ब्लॉग  हा फक्त interview मध्ये सांगायची गोष्ट झालाय "I write a blog in marathi" , But am I "Writing?" it- No
काहीतरी मागे खेचत होतं मला, किंवा काही सापडत न्हवतं मनाजोगतं. रोज सकाळी कामावर  जायची घाई
 मग आल्यावर थकवा, झोप  आणि मग पुन्हा दुसरा दिवस, पण दिवस घालवणे आणि 
साजरे करणे ह्यात फरक असतो, मी घालवत होते!!
             पण देव काही तुमची पाठ सोडत नाही तुमच्यातला कलाकार नाही कलाकार तरी रसिक झोपू नये ह्याची तो पुरेपूर काळजी घेतो, मग ह्या न त्या कारणाने तुम्ही जागे होता आणि त्याची आज्ञा  पाळता.
            परवा सकाळी मला ह्या गोष्टीचा साक्षात्कार झाला!! सकाळची वेळ तयारीला  लागावं  असा विचार करत असतांनाच मला एक चमत्कार दिसला!! हो तो चमत्कारच होता . माझ्या दारा  समोरच्या  झाडाला एक कोळ्याच जाळ आणि त्यात सुंदर हिऱ्यांचा हार बनलेला, मी माझा camera आणला  आणि  लागले कामाला...
           




                                            
पावसाच्या सरींनी आणलेली हि सुंदर भेट मला तरी जागं करून गेलीये.


12 comments:

  1. hey keep it up...

    ReplyDelete
  2. वा! बरेच दिवसांनी तू काहीतरी लिहिलंस छान वाटतंय वाचायला. खरंच खूप अप्रतिम आहेत फोटो.

    ReplyDelete
  3. माझ्या लाडक्या वाचकाची प्रतिक्रिया इतक्या लवकर बघून मला पण छान वाटलं!!! धन्यवाद !!!!!

    ReplyDelete
  4. वा! देणगीच म्हणायची ही एक प्रकारची :-)

    ReplyDelete
    Replies
    1. हो देणगीच आहे खरोखर!! प्रतिक्रियेबदल धन्यवाद!!!!

      Delete
  5. खूपच सही आहे हार...
    तू स्वत:हून लिहीत नाहीस म्हटल्यावर निसर्गानीच तुला लिहायला उद्युक्त करायचा ठरवलेलं दिसतंय....

    ReplyDelete
    Replies
    1. तसंच काहीसं असावं!!

      Delete
  6. Special Thanks for reducing the font size... ;)

    ReplyDelete
  7. अप्रतिम फोटो टिपला आहे

    ReplyDelete
    Replies
    1. हो अभावानेच मिळतात असे फोटो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!!!

      Delete