माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि लोकांबद्दलचं माझं मत.....

Tuesday 5 April 2011

पहिली post

      आपला पहिलावहिला  blog  त्याची पहिलीवहिली  post  काय असावी ह्या बद्दल मला तरी वाटत कि प्रत्तेक   blogger   विचार करत असणार. तसाच तो मीही केला पार डोकं फिरे परेंत केला मग विचार केला कि हाच  चांगला विषय होऊ शकतो...!!!
     काहीतरी लिहायला लावणारे प्रसंग आयुष्यात अनेक येतात, ते लेखन कधी उस्फूर्त  तर कधी compulsary अश्या स्वरुपात असतं.
शाळेत मराठी चे निबंध,  काहींना कंटाळवाणे तर काहींसाठी  तेवढाच प्रकार एक चांगला वाटणारा ( अर्थातच मी दुसऱ्या  category मध्ये  येते).
पण आपले हे लेखानाविष्कार फक्त शाळेतल्या 
कुलकर्णी बाई किंवा मराठे सर म्हणा फार तर ,ह्यांच्या परेंतच

जाणार ह्याची खात्री  असायची .
    आता मात्र surf  करतकरत  कोणीही तुमचा  "लेखानाविष्कार"  बघू शकतो. त्यावर comment पण करतात म्हणे लोक (ह्यावर comment 
द्यावी हि अपेक्षा आहे). मग अशी आपली पहिली post  चांगली घासून
पुसून लक्ख नको का  करायला?
     पहिल्या प्रथम लिहिणाऱ्या माणसाच्या डोक्यात हजारो विषय पिंगा घालत असतात. जसेकी, ते त्या दिवशी सुचलेल्या विषयावर लिहू का?  परवा फारच भन्नाट कल्पना आली होती तीच लिहावी,
नाहीतर मग असंच करू का कि आत्ताच्या " Latest Events"  बद्दल लिहायला सुरवात करावी  एकन  अनेक.... मला वाटत लोक आपल्या फार जवळच्या  विषयाला प्रथम हात घालत असावेत आणि मग गाडी रुळावर येत असावी.
     पहिली post  लिहितांना अजून काही भारी कल्पना माणसाच्या मनात येत असाव्यात जसेकी लोक माझा  blog  वाचतील  त्यांना तो फार आवडेल (नाही आवडणार अशी कल्पना माझ्या मते फार कमी लोकाना शिवत असावी)
  मग ते फारच मस्त comments देतील and so on.....    
     हे सगळे विचार मनात असताना पहिली post  publish होते आणि काहींच्या अपेक्षा पूर्ण होतात तर काहींच्या पूर्ण  व्हायला थोडा   
आवधी  अजून लागणार असतो पण मग माणसाला त्या excitement ची " सवय"  होते आणि विषय सुद्धा सुरळीत सुचायला लागतात
आणि तो एक नियमित blogger  बनतो.
      तर वाचक मित्रहो मीपण  कमी अधिक प्रमाणात असाच विचार केला आणि माझी  पहिली post  लिहिली आता पुढील गोष्टी तुमच्या हातात. एक नवीन blogger  तुमच्या comments ची वाट बघते आहे.....


      

 
 

4 comments:

  1. ठीक आहे madam , ही घ्या comment .... अगदी सहज बोलता बोलता छान जमलीये भाजणी... पहिला लेखनाविष्कार तर लख्ख झालाय.... पुढच्या पोस्ट्स सुद्धा अशाच सहजसुंदर असतील ही अपेक्षा .... तुझ्या या नवीन प्रवासास शुभेच्छा !

    आकांक्षा

    ReplyDelete
  2. Good....I liked it...keep it going...:-)

    ReplyDelete
  3. ब्लॉग विश्वात स्वागत...सगळेच ब्लॉगर असे उतावीळ होतात सुरुवातीला...जे काही असेल मनात ते उतरू दे पानावर...शुभेच्छा!

    ReplyDelete