माझ्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि लोकांबद्दलचं माझं मत.....

Monday 25 April 2011

नाशिक- पुणे- नाशिक

     मागच्यावर्षी पुण्याला शिकायला गेल्या पासून मी हा प्रवास record  तोड वेळा केला असेल. लोक blog मध्ये त्यांनी बघितलेल्या सुंदर ठिकाणाबद्दल,अविस्मरणीय प्रवासाबद्दल लिहितात. पण त्या सगळ्या पेक्षा अगदी विपरीत हा प्रवास रटाळ, कंटाळवाणा आणि बोरिंग ह्या तिन्ही
 शब्दांना पुरून उरणारा आहे. प्रवास तसा
आहे ५-६ तासांचाच पण वर लिहिल्या प्रमाणे अंत बघणारा.
साथीला एखादं पुस्तक किंव्वा कानात गाणी असतील 
 तर  ठीक नाहीतर मग तुमचं काई खरं नाई. ह्यावर तुम्ही 
विचाराल, "लोक असतात गाडीत त्यांच्याशी नाई का बोलता येत?"
येतं कि, नाई कोण म्हणतंय पण बरेचदा तेही ह्या रटाळ 
प्रवासाने हैराण झालेले असतात. म्हणजे कसाय नं 
सुरवातीला बरर्याच गोष्टी होतात पण मग कंटाळा येतो हो!
पण काही लोक मात्र लई भारी असतात, अश्या
परिस्थितीत सुद्धा त्यांचा stamina टिकून असतो,
कधी कुठल्या काकू असतील तर त्या आपल्या
घरच्या लोकांच्या तक्रारी करतात तर काका "व्यवस्थे" 
बद्दल तक्रार करतात, सूर सारखाच असतो. समवयीन म्हणाल 
तर फार कमी बोलतात.  
बरं बाहेर बघावं म्हंटल तर अशी "विहंगम" दृश्य दिसतात 
             
  
 ह्या वर जर तुमचं मत असं असेल कि हि उन्हाळ्यातली 
चित्रं आहेत इतर ऋतूत परिस्थिती चांगली असेल तर 
उत्तर आहे "नाही". म्हणजे दोन चार पानं जास्त लावून 
टाका झाडांना अजून फारसा काही फरक नसतो. 
"टकले डोंगर" प्रकार इथे विपुल प्रमाणात बघायला मिळतो.
  
मला काय वाटतं इथल्या traffic मुळे त्यांची अशी अवस्था 
झाली असेल. खरंच प्रचंड traffic असतं हो या रस्त्यावर.
बस सोडून अजूनही साधनं आहेत येण्याजाण्याची,
आता हेच बघा ना.            
    
                
       हा प्रवास आता इतका अंगवळणी पडला आहे न कि
कोणतं गाव आलं हे नुसत्या त्या गावच्या काही दुकानांच्या 
पाट्या बघितल्या कीच लक्षात येतं. "आळेफाटा ट्रोमा सेंटर" 
बघितल्या वर  "आळेफाटा" आलं हे समजावं, दुकानांची
अफाट गजबज म्हणजे "मंचर",तर "प्रवरा" शब्द नावात असलेली 
दुकानं "संगमनेर" ला असतात. तीच  प्रवरा नदी सध्या काही 
अशी दिसते आहे.


असो, मध्ये भूक लागल्या वर आपण "दौलत" ची पाटी शोधावी 
 तर "विट्ठल कामत" सुद्धा "छान" ची खुण करत 
आपल्या "Vitthal Kamat's" ची ad करत असतात.
ह्या वळणावर आता "काठीयावाड" चा board दिसेल                   
असं वाटतं आणि तो दिसतोही, तसाच "गारगोटी" संग्रहालयाचा 
  board कधी पासून त्याच वळणावर ताटकळत उभा आहे.
पुढे पुण्या जवळ जातांना महत्वाची गोष्ट दिसते ती म्हणजे
नवी बांधकामं आणि अर्धवट अवस्थेतले  flyovers ,
"बांधकाम चालू आहे" ची पाटी सांभाळत. ह्या दरम्यान
"hot chips" चा देशी अवतार "गरम वेफर्स" आणि
"मास्तर नाश्ता सेंटर" आपले वेगळेपण जपत असतातच.  
         हि तर झाली पाट्यांची  कथा, बाकी काही गोष्टी ज्या   तुमचं लक्ष वेधू शकतील त्या म्हणजे मध्ये लागणारी
 गावं. तसं गावांत काय मजेशीर असणार म्हणा पण 
त्यांचा "typical" पणा त्यांना मजेशीर बनवतो. दुकांनांची 
गजबज,नावांची hordings ह्या त्यातल्याच काही गोष्टी. 

    
   घराबाहेर वाळू घातलेली गादी आणि वर फडकणारा 
झेंडा सुद्धा 

 
तुम्ही आकोडा टाकून वीज घेण्या बद्दल ऐकलं असेलच ना 
हा बघा त्याचा एक नमूना 




तर असं मजल दरमजल करीत तुम्ही नाशिक किंव्वा पुणे 
येथे पोहोचता. 

      ५-६ तासांच्या रटाळ प्रवासला अलविदा करून पुन्हा
आपल्या कामाला जाता परत तोच प्रवास करायचा असतो ना.


टीप: ह्या blog मधले सगळे फोटो मी काढलेले असून  कुठूनही
"ढापलेले" नाही.

          
  
  
 

8 comments:

  1. तुम्ही एवढा रटाळ प्रवास सांगण्याचा प्रयत्न केला आहे..पण तुम्ही जे लिहिले आहे ते वाचून हा प्रवास एवढा रटाळ वाटत नाही..मी ही ह्या route चा प्रवासी आहे..म्हणजे फक्त संगमनेर पर्यंत.....पण एवढा रटाळ पणा वाटत नाही...नाही म्हणायला कधी कधी वाटतो...
    पण पुणे-नाशिक जास्तच रटाळ वाटत असेल..तरीही चांगले लिहिले आहे..

    ReplyDelete
  2. lai bhari... me pan hach prawas karun bore hoto khup... nsk la yetana thode bare watte ghari challo jat asto mhanun... :)

    ReplyDelete
  3. धन्यवाद वाचकहो!!! माझ्या ह्या प्रयत्नाला दाद दिल्याबद्दल....अपेक्षा करते कि हा प्रवास आता इतका रटाळ नाही राहणार........

    ReplyDelete
  4. हर्षदा...मी मुळचा आळेफ़ाट्याजवळील बेल्हे गावचा पण हल्ली मु.पो.पुणे त्यामुळे गावी जाण्याच प्रमाण कमी झाल...मला वाटत पुणे ते आळेफ़ाटा प्रवास एवढा काही बोअर नाही...हा परीसर बागायती असल्याने एवढा कंटाळवाणा नाही....कदाचित संगमनेरच्या पुढे असु शकेन...मागील आठवड्यातच गावी जाउन आलो...रुंदीकरणासाठी आळेफ़ाट्यावर मोठ्या प्रमाणात झाड तोडण्यात आल्यामुळ एकदाम वैराण वाटत आहे...विकास साधण्याच्या नावाखाली सर्व परीसर भकास झाला आहे.

    ReplyDelete
  5. अलबत !! ह्या रस्त्यावरच्या traffic आणि विकासाने हा अवस्था झाली असेलही कदाचित. म्हणूनच काही फोटो देऊन मी हा प्रवास कमी रटाळ करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही comment दिल्या बद्दल

    धन्यवाद !!!!

    ReplyDelete
  6. sorry Harshada ,pan mala Pune-Nasik pravas kadhich bore hot nahi,mala ha pravas avadato.
    1)first ki aaplya saglya manasanna bhetayala milnar mhanun mi khup anandi asate.
    2)pavsalyat saglya dongra-varun dhabdhabe padat astat.
    3)khup ghat ahet,dongar-darya ahet.
    4)ani mala khup chhan vatate.
    pan mala Sangamner ajibat aavdat nahi(sorry sangamnerkar people)
    5)last but not the list "Daulat" Dhaba.

    ReplyDelete
  7. well ,extremely sorry dear पण हि post नाशिक-पुणे-नाशिक अशी आहे त्यामुळे त्यात नाशिक हून पुण्याला जाणे सुद्धा येते हे तू विसरलीस still I appreciate your comment

    ReplyDelete
  8. hey, nice write up...even i am contempleting writing motorcycle diaries...lets c

    ReplyDelete